Mauali



माऊली,
Mauli


शब्द तुमचे , विचार तुमचे तुम्हीच महाज्ञानी ।
मला वाटले म्हणून देतो मी काय भोळा प्राणी  ।।



माऊली ,
तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनी । कमी नाही आम्हास पाणी ।।



माऊली ,
परंतु माय माता भूमीही तहाणली आता ।
पाणी पाणी म्हणती सर्व हीच सर्वांची व्यथा ।।



माऊली ,
सुज्ञ करा जना सांगा लावण्यास वृक्ष ।
दुष्काळ आहे वैरी सांगा टाळण्यास लक्ष ।।



माऊली ,
दुष्काळाने घातला आहे बघा कसा घाला ।
कळू द्या सर्वांस बुद्धि द्या सर्वाला ।।



माऊली, 
करतो विनवणी म्हणे तुमच्या रूपा ।
सुखी ठेवा सर्वां करा एवढीच कृपा ।।